Loading...

Chhatrapati Shahu MaharajResearch, Training And HumanDevelopment institute (SARTHI)

(An Autonomous Institute Of Govt. Of Maharashtra)

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी “कंपनी कायदा 2013 च्या कलम 8” अन्वये स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र राज्यातील नॉन-प्रॉफ़िट कंपणी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा , कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरीता या कंपणीची स्थापणा करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी, पुणे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या विकासासाठी विविध योजना राबविते. राज्यातील लक्षित गटातील उमेदवारांच्या कौशल्यात वाढ होऊन रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता वाढीस लागून अर्थिक प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होण्यासाठी सारथी संस्थेमार्फत ‘सारथी कौशल्य विकास कार्यक्रम’ ही अभिनव व महत्वकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे. सध्या राज्यात उपलब्ध कौशल्य आणि भविष्यातील कौशल्य प्राप्तीचे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) अंतर्गत नोंदणीकृत (पंच तारांकीत व चार तारांकीत) 5 स्टार व 4 स्टार प्राप्त संस्थाद्वारे चालविण्यात येणारे सर्व कोर्सेस उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. योजनेची अमंलबजावणी राज्यातील उपलब्ध सेवा / नोकरी यांची मागणी विचारात घेवून करण्यात येत आहे. विहीत शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या पात्र १८ ते ४५ वयोगटातील उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. आधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देत कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे सारथी लक्षित गटाला रोजगार किंवा स्वयंरोजगाराद्वारे स्वयं-सक्षम बनविणे हा सारथी संस्थेचा हेतू आहे.